Belagavi

प्रवाशांच्या सोयीसाठी बेळगाव बसस्थानकावर पाणपोई प्रारंभ

Share

कडक उन्हाने हैराण झालेल्या प्रवाशांना स्वच्छ आणि थंड पाणी पुरवण्याचे काम बेळगावच्या श्री सालासर सत्संग परिवाराकडून करण्यात येत आहे . बेळगावच्या बसस्थानकावर गेल्या चार वर्षांपासून हा उपक्रम राबवण्यात येत आहे .

बेळगावच्या बसस्थानकावर या उपक्रमाचा शुभारंभ करून माहिती देताना श्री सालासार सत्संग परिवाराचे अध्यक्ष अनिल नवाल यांनी सांगितले कि , आपल्या बेळगावच्या बसस्थानकावर येणाऱ्या प्रवाशांसाठी गेल्या चार वर्षांपासून हा उपक्रम राबवत आहोत . उन्हाळ्यात प्रवाशांना थंड पाणी उपलब्ध करून देत आहोत . यासाठी बेळगाव डेपोचे सहकार्य चांगले लाभत आहे . आमच्या संस्थेकडून दररोज देण्यात येणारे ८० ते ९० थंड पाण्याचे कॅन संपतात . ३ ते ४ हजार लोक या थंड पाण्याचा लाभ घेतात . प्रवाशांना स्वच्छ आणि थंड पाणी मिळावे आणि त्यांचे आरोग्य चांगले राहावे हाच त्या मागचा हेतू आहे असे सांगितले .

यावेळी , पवन बजाज, गोपाळ उपाध्याय , मधुसूदन हेडा , नटवर मोडणी , गोपाळ भट्टड . विजय राठी , दिनेश शर्मा , पंकज राठी , आणि सालासर सत्संग परिवाराचे सदस्य उपस्थित होते .

Tags: