‘तुम्ही बिर्याणी खाऊन इतरांना मात्र चॉकलेट वाटताय’ असे सांगत माजी आमदार रमेश कुडची यांनी जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्यावर निशाणा साधला आहे.
बेळगाव आणि चिक्कोडी लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसच्या उमेदवारांची नावे जाहीर झाल्यानंतर बेळगाव काँग्रेसमधील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. काही महिन्यांपूर्वी बेळगाव येथे झालेल्या कुरुबा (धनगर) समाजाच्या अधिवेशनात धनगर समाजाच्या कार्यकर्त्याला चिक्कोडी लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे तिकीट देणार असल्याचे मंत्री सतीश जारकीहोळी यांनी सांगितले होते. मात्र तसे केले नाही असे सांगून माजी आमदार रमेश कुडची यांनी काँग्रेस नेत्यांविरोधात नाराजी व्यक्त केली.
बेळगावातील धनगर समाज अधिवेशनात मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यासमोर चिक्कोडीत धनगर समाज आणि बेळगावमध्ये लिंगायत समाजाला तिकीट देणार असल्याचे सांगितले होते. मात्र बेळगाव व चिकोडी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या तिकिटासाठी इच्छुक असलेले अनुक्रमे लक्ष्मणराव चिंगळे आणि विनय नावलगट्टी यांना अनुक्रमे बुडा अध्यक्षपद आणि हमी योजना प्राधिकरणाचे अध्यक्ष केले, अशी नाराजी त्याची व्यक्त केली.
बेळगाव आणि चिक्कोडी लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार प्रचंड बहुमताने विजयी होतील, असे ते म्हणाले. काँग्रेससाठी काम करणारे अनेक कार्यकर्ते आहेत. सर्व समाजातील लोकांना घेऊन एक मजबूत काँग्रेस पक्ष उभा करण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत. या पार्श्वभूमीवर बेळगावात काँग्रेस भवनमध्ये भव्य मेळावा घेऊन कार्यकर्त्यांशी सल्लामसलत करण्याची संधी आहे. या पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणुकीत उमेदवारांच्या विजयासाठी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.
एकंदर, चिंगळे आणि नावलगट्टी यांना बेळगाव व चिकोडी येथून तिकीट न देऊन पक्षनेत्यांनी अन्याय केल्याची भावना माजी आमदार रमेश कुडची यांनी जाहीरपणे बोलून दाखवली आहे. त्याची काँग्रेस हायकमांड कितपत दखल घेणार हे पहावे लागेल.


Recent Comments