एका कार चालकाने केएसआरटीसी चालकाला एअरगन दाखवत दादागिरी केल्याची घटना बेळगाव येथील आर. एन. शेट्टी पॉलिटेक्निक सर्कलजवळ दुपारी घडली. या घटनेनंतर पोलिसांनी कार चालकाच्या मुसक्या आवळल्या आहेत.
आर. एन. शेट्टी पॉलिटेक्निक सर्कलजवळ आज गुरुवारी दुपारी बसच्या समोर अचानक कार आडवी आली. त्यावेळी कारमध्ये असलेल्या आझमनगर येथील मोहम्मद शरीफ आणि केएसआरटीसी बस चालक मल्लिकार्जुन यांच्यात शाब्दिक वाद झाला. त्यानंतर दोघांनीही एकमेकांना शिवीगाळ केली. यावेळी मोहम्मद शरीफ याने आपल्याकडील एअरगन चालकावर रोखून दाखवत दादागिरी केली.
या संदर्भात माळमारुती ठाणे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी आरोपी शरीफ याला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे.


Recent Comments