Kagawad

कागवाडमध्ये शेडबाळ नगर पंचायतीकडून मतदान जनजागृती

Share

माझे मत हा माझा हक्क आहे, मतदान हा माझा संवैधानिक अधिकार आहे, माझे मत विक्रीसाठी नाही, प्रत्येकाने मतदान सक्तीचे करावे, अशा शब्दात शेडबाळ नगरपंचायतीचे मुख्याधिकारी व कर्मचारी, प्राथमिक शाळेतील विद्यार्थी व जनतेने एकत्र येऊन शेडबाळ येथे मतदान जनजागृती केली .

बुधवारी शेडबाळ नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी भारती दंडोती यांच्या नेतृत्वाखाली नगरपंचायतीचे सर्व कर्मचारी, ग्राम लेखापाल एम.बी.बडिगेर, शासकीय प्राथमिक शाळेचे विद्यार्थी, शिक्षक यांनी बसस्थानकापर्यंत मतदान जनजागृती रॅली काढली . मतदान जागृतीचे फलक हातात घेऊन त्यांनी मतदारांना मतदानाचे महत्व पटवून दिले .

शेडबाळ नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी भारती दंडोती म्हणाल्या की, लोकसभा निवडणुकीत राज्य निवडणूक आयोग व जिल्हा अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार प्रत्येक मतदाराने मतदान करणे सक्तीचे आहे , निवडणूक म्हणजे तो दिवस राष्ट्रीय सण म्हणून साजरा व्हावा, त्यांच्या घरात आजी-आजोबा आहेत, आई-वडील आणि 18 वर्षांपेक्षा जास्त वयाची मुले आहेत. सर्व बांधवांनी त्यांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहित केले पाहिजे, सर्वांनी मतदान केले तर देशाला सुशासन देणारे खासदार निवडून येतील. असे म्हणत त्यांनी मतदारांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून दिली.

प्राथमिक शाळेतील शिक्षक प्रकाश साजणे यांनी सर्व विद्यार्थ्यांना व जनतेला मतदानाचे महत्त्व सांगितले. या कार्यक्रमात गावचे प्रशासकीय अधिकारी के. पी. बडिगेर, नगरपंचायत आरोग्य विभागाचे अधिकारी बसवराज बोलशेट्टी, अशोक तीर्थ, महादेवी गुणापूर, ज्योती पाटील, सुधीर मलापगोळ, शिक्षक प्रकाश साजणे, के. आर. कुंभार यांच्यासह स्थानिक नगरपंचायतीचे सदस्य व नागरिक सहभागी झाले होते.

Tags: