Hukkeri

वाहनावर प्रेसचा स्टिकर चिकटवून चंदनाची तस्करी : हुक्केरी वनविभागाकडून कारसहित 40 किलो चंदन जप्त

Share

वाहनावर प्रेसचा स्टिकर लावून बेकायदेशीररित्या चंदनाची वाहतूक करणारे वाहन आणि सुमारे 40 किलो चंदन हुक्केरी वनविभागाचे अधिकारी प्रसन्न बेल्लद यांच्या नेतृत्वाखालील पथकाने जप्त केले .

हुक्केरी तालुक्यातील गुडस गावाच्या हद्दीत चंदनाच्या लाकडाची तस्करी होत असल्याची खात्रीशीर माहिती मिळताच स्विफ्ट डिझायर कार क्रमांक केए 51 – एमके 7821 या गाडीचा पाठलाग केला असता आरोपी अंधारात कार रस्त्यावर सोडून पळून गेले. .
“प्रेस” असा स्टिकर कारच्या समोर चिकटवण्यात आला होता आणि टीव्ही 11 कन्नड वाहिनीच्या बागलकोट जिल्हा प्रतिनिधी पुंडलीक बजंत्री यांचे ओळखपत्र कारच्या आत सापडले.

वनाधिकारी प्रसन्न बेल्लद यांनी गुन्हा दाखल करून घेतला . या प्रकरणाचा तपास सुरू असून आरोपींच्या अटकेसाठी जाळे लावण्यात आले आहे. मुख्य वनसंरक्षक मंजुनाथ चव्हाण व उप वनसंरक्षक एस.एस.कल्लोलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक वनसंरक्षक शिरूद्रप्पा कबाडगी, प्रसन्न बेल्लद , विष्णुकुमार नाईक, रायप्पा बबली व कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.

Tags: