Dharwad

धारवाड तालुक्यातील कल्ले गावात सिलेंडरचा स्फोट : एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू

Share

धारवाड तालुक्यातील कल्ले गावात सिलेंडरचा स्फोट होऊन एका महिलेचा मृत्यू झाला असून चार जण जखमी झाले आहेत.
महादेवी वगेनवर (३०) असे या घटनेत मृत्यू झालेल्या दुर्दैवी महिलेचे नाव आहे. सुरेश वगेनवार, श्रीधर वगेनवर, चिन्नाप्पा वगेनवर आणि गंगव्वा वगेनवर हे जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी धारवाड जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सकाळी गॅस गळती झाली. अचानक झालेल्या ठिणगीने सिलेंडरचा स्फोट होतो. त्यामुळे संपूर्ण घराला आग लागली आणि अनर्थ घडला. स्वयंपाकघरात असलेल्या महादेवी बाहेर येऊ न शकल्याने तिथेच अडकून त्यांचा मृत्यू झाला. यामुळे महादेवीचे शरीर पूर्णपणे नष्ट झाले आहे. घरातील अन्य चौघेजण या दुर्घटनेत जखमी झाले आहेत . शेजारी दोन सिलिंडर होते. पण त्यांना आग न लागल्याने आणखी एक मोठा अनर्थ टळला . अग्निशमन दल आणि गरग स्टेशन पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे.

Tags: