बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी शहरातील गांधी मार्केट येथे शॉर्टसर्किटमुळे गोदामाला आग लागून गोदाम जळून खाक झाल्याची घटना घडली.


हे बागवान समाजाचे गोदाम असून, रात्री 12 वाजण्याच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे आग लागली.गोदामाच्या आत प्लॅस्टिकचे क्रेट होते, त्यामुळे आग जास्त भडकण्याची शक्यता होती . चिक्कोडी अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली.घटनेची माहिती मिळताच गुलाब हुसेन बागवान, नगरपालिकेचे मुख्याधिकारी महांतेश निडोनी, सीपीआय एन सी दरिगौडर यांनी घटनास्थळी भेट दिली.


Recent Comments