जगदीश शेट्टर यांना बेळगाव लोकसभेचे तिकीट मिळणार असल्याच्या वृत्ताच्या पार्श्वभूमीवर तिकीटासाठी इच्छुक असलेल्या स्थानिक नेत्यांच्या समर्थकांनी सोशल मीडियावर ‘गो बॅक शेट्टर ’ मोहीम सुरू केली आहे.
एका पक्षातून दुसऱ्या पक्षात पक्षांतर करणारे जगदीश शेट्टर आम्हाला नकोत . ‘स्थानिक नेते आमच्यासाठी चांगले; आमचे मत त्यांनाच आणि ‘सत्तेसाठी पक्ष सोडून गेलेल्यांना क्षेत्र सोडणे मोठे नाही अशा घोषणा त्यांनी फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सॲपच्या माध्यमातून दिल्या.
शेट्टर यांची ‘हात’ रंगवलेली व्यंगचित्रेही इंटरनेटवर प्रसारित झाली आहेत. दरम्यान, ‘शेट्टर गो बॅक आंदोलन’ यशस्वी झाले, असे राजकीय वर्तुळात ऐकायला मिळत आहेत. बेळगावातील काही भाजप नेत्यांनी काल बंगळुरू येथे जाऊन प्रदेश भाजप नेत्यांची भेट घेतली आणि प्रदेश नेत्यांनी शेट्टर यांच्याऐवजी स्थानिक इच्छुकांना मतदारसंघ देण्याची मागणी केली.


Recent Comments