Belagavi

अनाथ व्यक्तीच्या मृतदेहावर समाजसेविका माधुरी जाधव यांनी केले अंत्यसंस्कार

Share

निराधार व्यक्तीला आधार देणाऱ्या समाजसेविका माधुरी जाधव पाटील यांनी एका अनाथ व्यक्तीवर अंतिम संस्कार केले आहे
वणवण फिरून आपले जीवन कंठणाऱ्या अनाथ वृद्धाचा मृत्यू झाला पण अंतिम संस्कार कोण करणार हा प्रश्न पडला होता. समाजसेवेची नेहमी तळमळ असणाऱ्या समाजसेविका माधुरी जाधव पाटील यांनी पुढाकार घेऊन त्या मृत्यदेहावर स्वतः अंत्यसंस्कार केले.

गेल्या काही दिवसापासून खासबाग येथील निराधार केंद्रामध्ये राहत असलेले वयोवृद्ध अण्णासाब चंदगड हे आजारी झाले होते, यांच्यावर उपचार करण्यासाठी म्हणून जिल्हा अस्पताल मध्ये दाखल करण्यात आले पण त्यांनी अखेरचा श्वास घेतला . , पण या मृत्यूदेहावर अंतिम संस्कार करण्यास कोणीच पुढे आले नाही, समाज सेवेला वाहून घेतलेल्या माधुरी जाधव पाटील यांनी या मृतदेहावर अंतिम संस्कार करण्याचे ठरवून अखेर स्वतः मृतदेह सदाशिव स्मशानभूमी मध्ये नेऊन अंतिम संस्कार केले,

स्वतःच्या खर्चातून अंतिम संस्कार करणाऱ्या समाजसेविका माधुरी जाधव पाटील , यांनी क्षणाचा विलंब न लावता या निराधार व्यक्तीवर अंतिम संस्कार केले, यांच्या सोबतीला स्मशानभूमी मध्ये नेहमी सेवा बजावणारे शंकर इराप्पा कोलकार यांनी या अंतिम संस्कार कार्यात हातभार लावला, यावेळी महानगरपालिका केंद्रातील संयोजक रावसाब शिरहट्टी यांनी समाजसेविका माधुरी जाधव याचे कौतुक केले

निराधार व्यक्तीवर अंतिम संस्कार करणारी व्यक्ती म्हटले तर माजी महापौर विजय मोरे यांचे नाव घेतले जाते याच पावलावर पाऊल ठेवून पुरुषाप्रमाणे एका स्त्रीने धाडस दाखवले आहे त्या म्हणजे माधुरी असेच म्हणावे लागेल

Tags: