मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या की, बेळगाव लोकसभेचे तिकीट मृणाल हेब्बाळकर यांना देण्याचा निर्णय काँग्रेस हायकमांडने घेतला आहे.
बेळगावमधील वडगाव काँग्रेस कार्यकर्त्यांच्या बैठकीला जाण्यापूर्वी माध्यमांशी बोलताना मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी चिक्कोडी लोकसभा निवडणुकीचे तिकीट प्रियांका जारकीहोळी याना आणि बेळगाव लोकसभा तिकीट मृणाल हेब्बाळकर यांना देण्याचा निर्णय हायकमांडने घेतला असून आज अधिकृतपणे तिकीट जाहीर होण्याची शक्यता असल्याचे सांगितले.
हायकमांडने मृणाल हेब्बाळकर यांना तिकीट दिले असून, काँग्रेसचे यश मतदारांसमोर मांडून मतदारांची मने जिंकण्याचा प्रयत्न करणार आहोत . प्रचारासाठी त्या येथे आलेल्या नाहीत. आपल्या मुलासाठी आले आहे . त्या म्हणाल्या कि , 5 वेळा निवडणुका झाल्यानंतर आरोप होणे सामान्य आहे.
हायकमांडने मला बेळगाव लोकसभेचे तिकीट देण्याचा निर्णय घेतल्याचे मृणाल हेब्बाळकर यांनी सांगितले, काँग्रेसचे तिकीट अधिकृतपणे जाहीर केल्यानंतर मी प्रत्येक गावात जाऊन काँग्रेस पक्षाची एकजूट करून पक्ष संघटित करणार आहे.


Recent Comments