लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिसांनी विजयपूर शहरात धडक कारवाई करत 2 कोटी 93 लाख 50 हजारांची रोकड जप्त केली आहे. विजयपूर शहरातील सिंदगी बायपासजवळ सीईएन पोलिसांनी मोठी कारवाई केली. हैदराबादहून हुबळीकडे टोयोटा कारमधून २.९३ कोटींची रोकड जप्त करण्यात आली.
बालाजी निक्कम, सचिन मोहिते यांना अटक करून 2.93 कोटी रोकड, टोयाटो कार आणि दोन मोबाईल फोन जप्त करण्यात आले असून, गोलघुमट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Recent Comments