बेळगाव शहरातील हिंडाल्को कारखान्याजवळ दि. 18 रोजी रात्री 10 वाजता पट्टेरी वाघाचे दर्शन झाल्यामुळे कारखान्यातील कामगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र या वृत्तात तथ्य नसल्याचे स्पष्टीकरण वनविभागाने दिले आहे.
वाघ दिसल्याची चर्चा सुरु झाल्यावर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली तसेच घनदाट जंगलात तपासणी केली असता वाघाच्या पायाचे ठसे आढळून आले नाहीत, असे सहाय्यक वनसंरक्षक एस. के. कल्लोळीकर यांनी सांगितले. वन कर्मचाऱ्यांची तपासणी सुरूच राहणार आहे. नागरिकांनी वनविभागाला सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले.
एकंदर, वन्य प्राण्यांचे बेळगाव शहरात वारंवार आगमन होत आहे, शहरात गेल्या आठवड्यात गजराजाचे दर्शन झाले होते आणि आता वाघाचे दर्शन झाल्यामुळे हिंडाल्को कारखान्याच्या आजूबाजूच्या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


Recent Comments