बेळगाव तालुक्यातील गोकुळनगर, मुतगा येथील आपल्या घरात झालेल्या चोरीचा तपास करून चोरलेले दागिने, साहित्य शोधून परत करण्याच्या मागणीचे निवेदन शंकर चन्नबसाप्पा इटगी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.
गोकुळनगर, मुतगा येथील आपल्या घरात ५ फेब्रुवारी रोजी चोरी करण्यात आली असून ७ तोळे सोने आणि १५ तोळे चांदीचे दागिने व साहित्य चोरण्यात आले आहे. याबाबत मारिहाळ पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मात्र पोलिसांकडून चोरट्यांचा शोध घेण्यात टाळाटाळ केली जात आहे. चोरट्यांचा शोध घेऊन चोरलेले दागिने करत करावेत अशी मागणी शंकर चन्नबसाप्पा इटगी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
याबाबत प्रसारमाध्यमांशी बोलताना शंकर इटगी व त्यांच्या पत्नीने सांगितले की, ५ फेब्रुवारीला आम्ही मुलीला आजारी असल्याने हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले होते. त्यादिवशी सायंकाळी ६ वाजता सगळेजण घरातून हॉस्पिटलमध्ये गेलो होतो. दुसऱ्या दिवशी सकाळी शेजाऱ्यांनी आम्हाला फोन करून चोरी झाल्याची माहिती दिली. आम्ही लगेचच घरी येऊन पाहिले असता, ७ तोळे सोने आणि १५ तोळे चांदीचे दागिने चोरल्याचे दिसून आले. ३० वर्षे कष्टाने राबून आम्ही थोडीथोडीबचत करून मुलांच्या शिक्षणासाठी आम्ही हे दागिने घेतले होते.
आम्ही लगेचच मारिहाळ पोलीस स्थानकात तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतला आहे. मात्र दीड महिना उलटून गेला तरी चोरीचा तपास लावलेला नाही. आम्ही चौकशी करण्यास गेल्यावर तपास सुरु असे सांगून टोलवाटोलवी केली जात आहे. आम्हाला आता पै पिऊन दिवस काढण्याची वेळ आली आहे. त्यामुळे चोरीचा लवकर तपास करून आमचे दागिने आम्हाला परत करावेत अशी विनंती आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनातून केली आहे, असे त्यांनी सांगितले.


Recent Comments