Belagavi

बेळगाव बाजारपेठेत फळांचा राजा हापूसची वाढली आवक

Share

फळांचा राजा हापूस आता बेळगाव बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर दाखल झाला असून आंब्याचा दर ग्राहकांच्या आवाक्याबाहेर असला तरी मोठ्या प्रमाणावर खरेदी सुरु आहे . बेळगावच्या होलसेल फ्रुट मार्केटमध्ये ग्राहक आंबा खरेदीसाठी दाखल होऊ लागले आहेत .

साधारणपणे मार्च प्रारंभापासून बाजारात आंब्याची आवक सुरु होते . बेळगाव बाजारपेठेत देखील हापूस आंब्यासह केशर , पायरी आणि अन्य जातींचे आंबे विक्रीसाठी दाखल झाले आहेत .मात्र ग्राहक मालवण, देवगड ,रत्नागिरी , वेंगुर्ला या कोकणातून येणाऱ्या हापूस आंब्याला जास्त पसंती दर्शवत आहेत .

बेळगावच्या होलसेल फ्रुट मार्केट मधील व्यापारी वसीम यांनी इन न्यूजला माहिती देताना सांगितले कि , अगदी सुरुवातील अर्ध्या डझनासाठी ३६०० रुपये असा दर होता . आवक वाढल्याने आता तो दोन हजार रुपयांपर्यंत उतरला आहे . त्यामुळे ग्राहक खरेदीसाठी येत आहेत . केशर , हापूस आणि पायरी जातीचा आंबा चांगल्या प्रतीचा मिळत आहे . दहा मग , एक डझन , सव्वा डझन , दीड डझन अशा पॅकिंगमध्ये आंबे येत आहेत . मालवण ,बेंगुर्ला , रत्नागिरी , देवगड येथून मालाची अवाक होत आहे . बाहेर ६०० ते ८०० रुपयांना आंबा विकी केली जात आहे . मात्र ग्राहकांना चांगली क्वालिटी हवी असेल तर त्यांनी इथे येऊन आंबे खरेदी करावेत असे आवाहन त्यांनी केले . शिवाय होळीनंतर आंब्यांचा दर थोडा कमी होईल असे सांगितले .

तर आंबे खरेदीसाठी आलेल्या इंजेशार या ग्राहकाने आंबे चांगल्या प्रतीचे आणि चवदार असून चांगल्या प्रतीचा माल आता मिळत असल्याचे सांगितले .

महांतेश नगर येथील एका ग्राहकाने या ठिकाणी चांगल्या प्रतीचा आंबा मिळत असल्याचे सांगितले . ग्राहकांना परवडेल अशा दरात सध्या आंबे उपलब्ध आहेत . आम्ही हापूस आंब्याला प्राधान्य दिले आहे . बाकी अन्य जातीचे देखील आंबे उपलब्ध आहेत . ग्राहकांनी याठिकाणी येऊन आंबे जरूर खरेदी करावेत असे आवाहन केले .


एकंदर बेळगाव बाजारपेठेत आता फळांचा राजा आंब्याचे अस्तिव जाणवू लागले आहेत . लोक आता आंबा खरेदी करू लागले आहेत . होळीनंतर आंब्याचा दर कमी होऊन सर्वसामान्यांना देखील आंबा खरेदी करता येणार आहे .

Tags: