कर्नाटक सरकारने बेळगावसह सीमा भागात सुरु केलेली कन्नड सक्ती तात्काळ मागे घेण्याची सूचना घावो , किमान संवेदनशील सीमाभागात कन्नड सक्ती मागे घेतली जावी अशी मागणी ८६५ मराठी गावांच्या वतीने प्रमुख १०१ गावांकडून पत्राद्वारे , केंद्रीय गृहमंत्र्यांकडे केली जात आहे .
व्हॉइस ओव्हर : सीमाभागातील सध्याच्या कन्नड सक्तीकडे केंद्रीय गृहमंत्र्यांचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीकडून हा उपक्रम राबवला जात आहे .
याआधी मराठी नेत्यांसहित तरुणांनी , जवळपास चाळीस हजारांहून अधिक पत्रे पाठवून केंद्राचे लक्ष सीमाप्रश्नाकडे वेधण्याचा प्रयत्न केला होता . मात्र आता नामफलकांवर 60 % कन्नड सक्ती चा कायदा लागू करण्यात आला आहे . त्यामुळे दुकानदार , उद्योजक , आणि सीमा भागात नाराजीचा सूर उमटत आहे . सर्वोच्च न्यायालयात सीमा प्रश्न प्रलंबित असताना देखील कर्नाटक सरकार मनमानी करीत आहे.
या पार्श्वभूमीवर , धनंजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली किरण हुद्दार , रोहन लँगरकांडे , शिवाजी मेणसे आदी कार्यकर्ते ही १०१ पत्रे गृहमंत्रालयाकडे पाठवणार आहेत .


Recent Comments