मित्रांसोबत फिरायला गेलेला दहावीचा विद्यार्थी किटवाड येथील लघु पाटबंधारे विभागाच्या धरण क्रमांक एक मध्ये बुडाल्याची घटना बुधवारी सायंकाळच्या सुमारास घडली .
बेळगावच्या वैभवनगर येथील उजेब तन्वीर मुजावर (वय १७ ) असे या घटनेत बुडून मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे . दहावीची संपल्याने , हे विद्यार्थी सहलीसाठी किटवाड धरणावर गेले होते . यावेळी धरणात आंघोळीसाठी हे युवक उतरले होते . त्यावेळी उजेब हा धरणाच्या पाण्यात बुडाला . त्याला बाहेत काढण्यासाठी त्याच्या मित्रानी प्रयत्न केला पण त्यांना यश आले नाही .
बुधवारी संध्याकाळी सात वाजल्यानंतर बेळगाव येथील पाणबुडे आणि बचाव पथकाकडून शोध मोहीम राबवण्यात आली . मात्र रात्रीपर्यंत या बुडालेल्या तरुणाचा शोध लागला नाही . आज सकाळी पुन्हा शोधकार्य सुरु करण्यात आले . त्यावेळी उजेब याचा मृतदेह धरणाच्या पाण्यात सापडला .
या प्रकरणी चंदगड पोलीस स्थानकात गुन्हा नोंद करण्यात आला आहे .


Recent Comments