Belagavi

खासदार अनंतकुमार हेगडे यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा करा दाखल : शेतकऱ्यांची मागणी

Share

माजी केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडे यांनी देशाच्या संविधानाचा अवमान करणारे, संविधान बदलणार असल्याच्या वक्तव्यावर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी विविध शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात जमलेल्या शेतकऱ्यांनी , खा . अनंतकुमार हेगडे यांनी देशाच्या संविधानाचा अवमान करणारे संविधान बदलणार असल्याच्या वक्तव्यावर तात्काळ कारवाई करावी या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले .

शेतकरी नेते सिद्धंगौडा मोदगी म्हणाले की, खासगी विमा कंपन्या पैसे न देता शेतकऱ्यांची फसवणूक करत असून, तालुकास्तरीय अधिकारीही खासगी विमा कंपन्यांकडे दुर्लक्ष करून शेतकऱ्यांची पिळवणूक करत असल्याचा आरोप केला. शेतकऱ्यांच्या, शेतमजुरांच्या समस्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन करावी, अशी मागणी त्यांनी केली . मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी कृषीविषयक कामे मार्गी लावली असून तहसीलदारांनी योग्य पद्धतीने कामे करावीत, असे निवेदन दिले.

माजी केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडे यांनी संविधान बदलणार असल्याचे वक्तव्य देशाच्या राज्यघटनेचा अपमान असून त्यांच्यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. सिद्दगौडा मोदगी, जयश्री गुरन्नावर , शिवलीला मिसाळे, संजय डोंगरगावी, मल्लिकार्जुन डोंगरगावी, शेखर आकणवर सिद्राई अंगडी तसेच अनेक शेतकरी यावेळी उपस्थित होते .

Tags: