युवा सक्षमीकरण आणि क्रीडा खाते हॉस्टेल बेळगावची ज्युदो खेळाडू कुमारी साईश्वरी कोडचवाडकर हिला महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते जवाहर बालभवन बेंगळुरू येथे कित्तूर राणी चन्नम्मा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त हा पुरस्कार महिला व बालविकास विभागातर्फे कला, क्रीडा, साहित्य आणि शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या युवती-महिला आणि असामान्य धैर्य दाखवणाऱ्या महिलांना ‘कित्तूर राणी चेन्नम्मा पुरस्कार’ आणि इतर विविध पुरस्कार प्रदान करण्यात आले.

बंगळूरच्या कब्बन पार्कमधील जवाहर बालभवन येथे आयोजित आंतरराष्ट्रीय महिला दिन-2024 कार्यक्रमात यश मिळविणाऱ्यांना बक्षीस देण्यात आले. ‘कित्तूर राणी चेन्नम्मा पुरस्कार’ राज्य सरकार 1994-95 पासून दिले जात आहेत.
बेळगावची साईश्वरी कोडचवाडकर ही एक प्रतिभावंत ज्युदोपटू असून रोहिणी पाटील आणि कुटुजा मुलतानी या ज्युदो प्रशिक्षकांच्या नेतृत्वाखाली नेहरू स्टेडियम बेळगाव येथे ज्युदोचा सराव करत आहे. ती राष्ट्रीय सुवर्ण आणि कांस्यपदक विजेती असून, तिने 7 वेळा राज्यस्तरीय सुवर्णपदक जिंकले आहे.


Recent Comments