बेळगाव जिल्ह्यातील अथणी तालुक्यातील संबरगी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या तावंशी गावात ए डी अधिकाऱ्यांना धारेवर धरल्याची घटना घडली.

नरेगा योजनेंतर्गत महिलांकडून 150 रुपये आकारल्याबद्दल महिलांनी नरेगा ए डी अधिकारी मोहम्मद कोतवाल यांना महिलांनी घेराव घातला महिलांच्या प्रश्नांना उत्तरे न देता अधिकाऱ्यांनीही उडवाउडवी केली आहे. यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी अथणी तालुका पंचायतीचे कार्यकारी अधिकारी येईपर्यंत आम्ही सोडणार नाही, अशी घोषणा देत आम्हाला न्याय हवा, अशा घोषणा दिल्या.
यावेळी बोलताना शोभा हिरेमठ यांनी अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केला की, आम्ही नरेगा योजनेत कामे केली आहेत मात्र अधिकाऱ्यांनी केवळ दीडशे रुपयांप्रमाणे बिल टाकले आहे.
तेव्हा ग्रामस्थ रावसाब तलवार यांनी सांगितले की, या ग्रामपंचायतीच्या महिला अध्यक्षा आहेत मात्र अध्यक्षाच्या पतीकडून ढवळाढवळ केली जाते आणि तो तिच्यावर अत्याचारही करतो. अथणी तालुका पंचायत कार्यकारी अधिकारी शिवानंद कोल्हापूरे यांनी घटनास्थळी धाव घेऊन लोकांच्या समस्या ऐकून घेतल्या.


Recent Comments