Belagavi

बेळगावात लिंगायत संघटनेतर्फे आंतरराष्ट्रीय महिला दिन

Share

बाराव्या शतकात स्त्री-पुरुष समानता प्रस्थापित करण्यात शरणांचे योगदान अनन्यसाधारण आहे, असे प्रतिपादन विद्या हुंडेकर यांनी केले.
बेळगावात लिंगायत संघटनेतर्फे आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यात आला. यावेळी विविध क्षेत्रात यश संपादन करणाऱ्यांचा सत्कार आणि विविध सांस्कृतिक उपक्रमांनी आंतरराष्ट्रीय महिला दिन अर्थपूर्णपणे साजरा करण्यात आला.

यावेळी साप्ताहिक सत्संगात मुख्य व्याख्यान देताना बोलताना राज्य पुरस्कार विजेत्या डॉ. दानम्मा झळकी यांनी भारतीय समाजात महिलांनी केलेली प्रगती, सध्याच्या परिस्थितीत समानतेच्या आधारावर महिलांकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहिले जाते इत्यादींविषयी उदाहरणांसह माहिती दिली.

साहित्यीक विद्या हुंडेकर म्हणाल्या की, बाराव्या शतकात स्त्री-पुरुष समानता प्रस्थापित करण्यात शरणाचे योगदान अनन्यसाधारण होते. द्वेषमुक्त समाज निर्माण करणे हे आपले ध्येय असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.  याच प्रसंगी विजया ऑर्थो आणि ट्रॉमा सेंटरचे संचालक डॉ. सुनीता पाटील यांचाही व्यासपीठावर सत्कार करण्यात आला. वर्षभर संस्थेत दर रविवारी वचन प्रार्थनेचे नेतृत्व करणाऱ्या महादेवी अरळी यांचाही सन्मान करण्यात आला.

लिंगायत संघटनेचे अध्यक्ष इरण्णा दयेन्नवर, संगमेश अरळी, सतीश पाटील, सदाशिव देवरमनी, अशोक इटगी, शंकर शेट्टी, विजय हुदलीमठ, रमेश कळसन्नावर, सुरेश नरगुंद, बसवराज करडीमठ, शिवानंद नायक, आनंद कर्की, बी. पी. जेवानी, व्ही. के. पाटील आदी उपस्थित होते.

Tags: