Belagavi

बेळगावात कन्नडेतर नामफलक हटवण्यासाठी मनपाची हडेलहप्पी

Share

बेळगावात कन्नडेतर नामफलक हटवण्यासाठी महानगरपालिकेची हडेलहप्पी सुरूच असून आज शहराच्या बापट गल्ली, गांधीनगर परिसरातील दुकानांचे कन्नड व्यतिरिक्त अन्य भाषेतील फलक हटविण्यात आले.

बेळगाव महापालिकेचे आयुक्त पी. एन. लोकेश यांच्या आदेशानुसार मनपा आरोग्याधिकारी डॉ. संजीव नांद्रे यांच्या नेतृत्वाखालील महापालिकेच्या पथकाने बेळगावात आज, मंगळवारी कन्नड व्यतिरिक्त इंग्लिश व अन्य भाषांमधील दुकानांचे फलक हटविले.
शहरातील बापट गल्ली, कार पार्किंग व आजूबाजूच्या परिसरात तसेच गांधीनगर व परिसरात फलक हटाव मोहीम राबविण्यात आली.

मनपा आरोग्याधिकारी डॉ. संजीव नांद्रे तसेच महसूल विभागाचे उपायुक्त गुरुनाथ यांच्या नेतृत्वाखालील आरोग्य निरीक्षक व महसूल निरीक्षक व मनपाच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी दुकाने व आस्थापनांवरील कन्नडेतर भाषांमधील नामफलक हटविले. बापट गल्ली व कार पार्किंग परिसरात ही मोहीम राबवण्यात आली. कार पार्किंगमध्ये खुद्द महापालिकेचाच पे पार्किंगचा बोर्ड इंग्लिश भाषेत असलेला आढळून आला. तोही हटविण्यात आला. अनेक ठिकाणी दुकानमालक स्वतःच फलक हटवताना दिसून आले.

Tags: