मुस्लिम समाजाचा पवित्र रमजान महिना उद्या मंगळवारपासून सुरु होणार आहे. आज सायंकाळी चंद्र पाहून उद्यापासून रमजान महिना सुरु होणार असल्याची घोषणा बेळगाव हिलाल कमिटीने केली.
बेळगावात आज सायंकाळी अंजुमन हॉलमध्ये झालेल्या हिलाल समितीच्या बैठकीत बेळगावच्या मुफ्तीनी आणि आमदार राजू सेठ यांनी मुस्लिम समाजाचा हा पवित्र महिना गांभीर्याने आणि पवित्र भावनेने साजरा करावा.
पहिला रोजा (उपवास) उद्या असून, या संपूर्ण रमजान काळात सर्वानी सर्व लोकांच्या कल्याणासाठी, आरोग्यासाठी प्रार्थना करावी असे आवाहन केले.


Recent Comments