चिक्कोडी लोकसभा मतदारसंघातून आपली कन्या प्रियंका जारकीहोळी यांना उमेदवारी देण्याची मागणी असून, याबाबत मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार बेळगावात आले असता त्यांच्याशी चर्चा केली हे खरे आहे, असे सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री सतीश जारकीहोळी यांनी सांगितले.
यमकनमर्डी मतदारसंघातील हुदली गावात प्रसारमाध्यमांशी बोलताना सतीश जारकीहोळी म्हणाले की, चिक्कोडी लोकसभा मतदारसंघातून प्रियंका जारकीहोळी यांनी निवडणूक लढविण्याबाबत मी जिल्ह्यातील नेत्यांशी पुन्हा एकदा चर्चा करून आणि सिद्धरामय्या आणि डीके शिवकुमार यांना सांगतो असे म्हटले आहे. याबाबत उमेदवाराचे मत विचारले पाहिजे. उमेदवाराने मी निवडणुकीला उभे राहणार नाही म्हटले तर अवघड होते. त्यामुळे निवडणुकीला उभे राहणाऱ्यांचे मतही तितकेच महत्त्वाचे असल्याचे ते म्हणाले.
बेळगाव आणि चिक्कोडी मतदारसंघाच्या निवडीसाठी चर्चेची फेरी झाली. उमेदवार निवडीसाठी अजून अवधी आहे. आपण आणखी एका फेरीची चर्चा करू. प्रत्येक गोष्ट मोजून-मापून निर्णय घ्यावा लागतो. निवडणूक जाहीर झाल्यावरही १५ दिवस वेळ असतो. बेळगाव आणि चिक्कोडी या दोन मतदारसंघातील उमेदवारांची निवड दुसऱ्या, तिसऱ्या किंवा शेवटच्या टप्प्यातही होऊ शकेल, असे ते म्हणाले.
प्रभारी असलेल्या विजयपूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवाराच्या घोषणेवर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की, विजयपूरमधून केवळ एकच उमेदवाराचे नाव सुचविण्यात आल्याने उमेदवाराचे नाव जाहीर करण्यात आले.


Recent Comments