Belagavi

फेसबुक फ्रेंड सर्कलकडून जळीतग्रस्त कुटुंबाला मदतीचा हात

Share

फेसबुक फ्रेंड सर्कल टीमने आज खानापूर तालुक्यातील निलावडे गावाला भेट देऊन जळीतग्रस्त कुटुंबाला किराणा व शैक्षणिक साहित्याची मदत सुपूर्द केली.

फेसबुक फ्रेंड सर्कल टीमला प्रसारमाध्यमे आणि गावकऱ्यांकडून एक संदेश मिळाला की, शॉर्टसर्कीटमुळे गरीब गवळी कुटुंबाचे राहते घर जळाले. या दुर्घटनेत सदर कुटुंबाचे मोठे नुकसान झाले. घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले असून त्यात घर, विजेचे साहित्य, खाण्याचे साहित्य, मुलांची शालेय पुस्तके, कपडे, ब्लँकेट आदींचा समावेश आहे. या नुकसानग्रस्त कुटुंबियांत जयवंत बाबू पाटील (वय 38), सोनिया जयवंत पाटील (वय 33), आणि 3 मुले – शीतल (16 वर्षे) ), बजरंग (11 वर्षे) आणि श्रावणी (5 वर्षे) यांचा समावेश असून, त्यांचा मोबाईल क्र. 9844579387 आहे.

दरम्यान, फेसबुक फ्रेंड सर्कल टीमने आज तातडीने जोगमठ (निलावडे) येथे जाऊन जीवनावश्यक वस्तू व मुलांच्या शैक्षणिक साहित्याची मदत केली. यावेळी संतोष दरेकर, डॉ रोहित जोशी, शैलेश भातकांडे, राहुल पाटील, अवधूत तुडवेकर, ग्रामपंचायत उपाध्यक्ष विनायक मुतगेकर आदी उपस्थित होते. या कुटुंबाला मदत करू इच्छिणाऱ्यांनी माहितीसाठी 9986809825 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन फेसबुक फ्रेंड सर्कल टीमने केले आहे.

Tags: