बेळगावातील मेणसी गल्ली येथे प्रसिद्ध श्रीराम हार्डवेअर्स अँड प्लायवूडसच्या नव्या विस्तृत श्रेणीच्या शोरुमचा भव्य शानदार उदघाटन सोहळा मंगळवारी पार पडला.
बेळगावच्या हार्डवेअर्स अँड प्लायवूडसच्या क्षेत्रात अग्रणी असलेल्या प्रसिद्ध श्रीराम हार्डवेअर्स अँड प्लायवूडस या फर्मची मेणसी गल्ली येथे नव्या विस्तृत श्रेणीची शोरुम कार्यान्वित झाली आहे. या शोरुमचा शानदार उदघाटन सोहळा मंगळवारी विविध मान्यवर, निमंत्रितांच्या उपस्थितीत पार पडला. श्रीराम हार्डवेअर्स अँड प्लायवूडसचे संस्थापक पुंडलिक रामचंद्र हंगिरगेकर व अन्य मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून शोरुमचे उदघाटन करण्यात आले.

यावेळी शोरुमविषयी माहिती देताना संचालक राजेश पुंडलिक हंगिरगेकर म्हणाले की, आमचे वडील पुंडलिक रामचंद्र हंगिरगेकर यांनी १९६० हार्डवेअर्स अँड प्लायवूडस विक्रीच्या क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांचे मार्गदर्शन आणि आशीर्वादाने आमच्या ग्राहकांसाठी आम्ही हे नवीन भव्य व प्रशस्त दालन सुरु केले आहे. आधुनिक जगात ग्राहकांच्या आवडीनिवडीनुसार घरकुलाच्या अंतर्गत भागात इंटेरियरसाठी लागणारे हार्डवेअर, डोअर अँड विंडो फिटिंग्ज, किचन ट्रॉलीज, बाथरूम फिटिंग्ज, ग्लास रोलिंग, इंटेरियर आणि आर्किटेक्चर हार्डवेअर फिटिंग्ज आणि एक्सटिरिअर मटेरियल माफक दरात उपलब्ध आहे. आमच्या ग्राहकांच्या सेवेसाठी ही भव्य शोरूम सुरु करण्यात आली असून, ग्राहक, हितचिंतकांच्या शुभेच्छा
आणि सहकार्यानेच आम्ही हा पल्ला गाठू शकलो, त्यांचे सहकार्य असेच लाभू दे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. अन्य एक संचालक नितीन पुंडलिक हंगिरगेकर यांनी सांगितले की, आमच्या शोरूममध्ये गोदरेज, जॉली, गुलशन, कोर्सा, ऑनलाईन आदी प्रसिद्ध कंपन्यांचे लॉक, किचन्स तसेच विविध प्रकारचे इंटेरियर, एक्सटेरिअर मटेरियल रास्त दरात उपलब्ध आहे. बेळगावसह उत्तर कर्नाटक, गोवा आणि पश्चिम महाराष्ट्रातील ग्राहक आमच्या शोरूम्समधून साहित्य खरेदी करतात. त्यांच्या पाठबळामुळेच आम्ही व्यवसायात प्रगती करू शकलो. भविष्यातही त्यांनी अशीच साथ द्यावी असे आवाहन त्यांनी केले.

तुकाराम बँकेचे ज्येष्ठ संचालक व सामाजिक कार्यकर्ते प्रकाश मरगाळे यांनी सांगितले की, पुंडलिक हंगिरगेकर अनेक वर्षांपासून हार्डवेअर आणि प्लायवूडसच्या व्यवसायात आहेत. त्यांच्या सोबत त्यांची मुलेही आता या व्यवसायात उतरून त्याचा विस्तार करत आहेत. ग्राहकांना सचोटीने व तत्पर सेवा देत त्यांनी व्यवसाय केल्यानेच त्यांना यात यश मिळाले आहे. भविष्यातही त्यांच्या व्यवसायाचा असाच विस्तार व्हावा अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या.
यावेळी पवन हंगिरगेकर, बांधकाम व्यावसायिक प्रशांत वांडकर, नितीन कित्तूरकर, विठ्ठल पारिशवाडकर, हंगिरगेकर कुटुंबीय आणि कंपन्यांचे प्रतिनिधी, विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.


Recent Comments