Belagavi

बेळगावात माजी सैनिकांची राज्य सरकारच्या निषेधार्थ निदर्शने

Share

राज्य सरकारी नोकऱ्यांमध्ये माजी सैनिकांना नियमाप्रमाणे १० टक्के आरक्षण न दिल्याच्या अन्यायाविरोधात माजी सैनिकांच्या महासंघाने सोमवारी बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालय आवारात आंदोलन केले.

राज्य सरकारी नोकऱ्यांमध्ये माजी सैनिकांची 10 टक्के टक्केवारी आरक्षण द्यावे असा केंद्र सरकारचा नियम आहे. मात्र या नियमानुसार आरक्षण दिले जात नसल्याच्या निषेधार्थ माजी सैनिकांच्या महासंघाने सोमवारी आंदोलन करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.

माजी सैनिक जगदीश पुजारी यांनी याविषयी बोलताना सांगितले की, जवळपास 30 वर्षे देशाची सेवा करून निवृत्त झालेल्या माजी सैनिकांना राज्य सरकारी नोकऱ्यांमध्ये 10 टक्के आरक्षण मिळाले पाहिजे. मात्र शासनाने नुकत्याच घेतलेल्या ग्राम लेखापाल आणि वनरक्षकांच्या भरतीत हा नियम पाळण्यात आलेला नाही. त्याचप्रमाणे अन्य नोकऱ्यांतही हा नियम पाळण्यात येत नाही. ही कृती सर्व माजी सैनिकांवर अन्यायकारक असल्याची तक्रार त्यांनी केली.

या आंदोलनात अनेक माजी सैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Tags: