Banglore

बेंगळूर स्फोटातील जखमींच्या प्रकृतीची मुख्यमंत्र्यांनी केली विचारपूस

Share

मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी बंगळुरूमधील रामेश्वरम कॅफेमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात जखमी होऊन उपचार घेत असलेल्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

रामेश्वरम कॅफेमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात नऊ जण जखमी झाले आहेत. जखमींवर वैदेही हॉस्पिटल आणि ब्रूकफिल्ड हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी रुग्णालयात जाऊन जखमींच्या प्रकृतीची विचारपूस केली.  6 जखमींना वैदेही रुग्णालयात दाखल करण्यात आले.

त्यापैकी दोघांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या चार जणांवर उपचार सुरू आहेत. तीन जखमींवर ब्रुकफिल्ड रुग्णालयात उपचार सुरू असून जखमींची प्रकृती स्थिर आहे. जखमींच्या जीवाला धोका नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

Tags: