Hukkeri

बालरोग तज्ञ डॉक्टरांवरील हल्ल्याचा निषेध नोंदवून हुक्केरीत डॉक्टर व वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे आंदोलन

Share

हुक्केरी शहरातील सार्वजनिक रुग्णालयातील बालरोग तज्ज्ञ डॉक्टरांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ हुक्केरी तालुका रुग्णालयातील डॉक्टर व वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी आज आंदोलन केले.

तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.उदय कुडची व मुख्य वैद्यकीय अधिकारी महांतेश नरसण्णा यांच्या नेतृत्वाखाली कर्मचाऱ्यांनी शासकीय रूग्णालयातून पायी शहर पोलिस ठाण्यापर्यंत मोर्चा काढला व कार्यरत डॉक्टरांना योग्य ते संरक्षण देण्याचे आवाहन पोलिस निरीक्षक जयंत गवळी यांनी केले.

प्रशासकीय इमारतीत तहसीलदार प्रकाश कल्लोळी यांना निवेदन देऊन डॉ.उदय कुडची यांनी सांगितले की, अलीकडे सरकारी डॉक्टरांवर हल्ले वाढले असून त्यामुळे रुग्णांवर मोफत उपचार करणे कठीण होत आहे.

यावेळी हुक्केरी सार्वजनिक वैद्यकीय अधिकारी डॉ.एम.सी.विजापुरे, डॉ.नाशीर मकानदार , डॉ.युनुस बालप्रवेश, डॉ.विनोद, डॉ.श्रुती व दिपक अंबाली, सरकारी कर्मचारी संघाचे अध्यक्ष अविनाश होलेप्पगोल आरोग्य कर्मचारी संतोष पाटील, श्रीदेवी शिरप्पगोल, सरस्वती दोड, डॉ. , मंजुळा हिरेमठ, भीमव्वा कलसप्पगोळ, उदय हजारे, मंजुनाथ बेटगेरी, हरीश कुमार आदींनी दिवसभर रुग्णांची सेवा बंद ठेवून आंदोलनात सहभाग घेतला.

Tags: