बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील नंदगड गावाच्या हद्दीत केएआरटीसी बस आणि मारुती व्हॅनची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात मारुती व्हॅन चालक ठार झाला.

गुंजी येथील नारायण भगवान पाटील (वय 45) असे मृत मारुती व्हॅन चालकाचे नाव आहे. ते खानापूर तालुक्यातील करंबळ व बेकवाड गावात ग्रामदैवत महालक्ष्मी जत्रेला जाऊन रुमेवाडी येथील आपल्या बहिणीला भेटून बेकवाडला असलेल्या नातेवाईकांना आणण्यासाठी येत असताना हा अपघात झाला.
नंदगड क्रॉस येथे समोरून येणाऱ्या केएसआरटीसी बसने त्यांच्या व्हॅनला धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले. उपचारांसाठी खानापूर येथे नेट असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, आई-वडील, भाऊ-बहीण असा मोठा परिवार आहे. नंदगड पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.


Recent Comments