कागवाडचे आमदार राजू कागे म्हणाले की, दर्जेदार रस्ते बांधकाम आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यासाठी राज्य सरकार तयार आहे.

कागवड तालुक्यातील ऐनापूर शहरातील ऐनापूर-मंगसुळी मार्गावरील ५०५४ परिशिष्ट योजनेंतर्गत मंजूर अनुदानातून ३ कोटी रुपये खर्चाच्या रस्त्याच्या कामकाजाचे पूजन , आ . राजू कागे यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आले.
पूजेच्या कार्यक्रमात सार्वजनिक बांधकाम विभागाचे जयानंद हिरेमठ, कंत्राटदार अर्जुन नाईक, सिद्धराय गाडीवड्डर, सदस्य अरुण गाणीगेर , प्रवीण गाणीगेर , संजय बिरडी , गोपाल कत्ती, कुमार जयकर, अरविंद कारंजी आदींसह अनेकांची उपस्थिती होती.


Recent Comments