कागवाडचे आमदार राजू कागे म्हणाले की, कागवाड तालुक्यातील सर्व गावांमध्ये घरापासून वंचित असलेल्या 2300 लोकांना घरांचे वाटप करण्यात आले असून, उगार नगरपालिकेच्या अखत्यारीतील कागवाड , शेडबाळ, ऐनापूर
नगरपंचायतीने या पैशाचा वापर करून घरे बांधावीत.

उगार नगरपालिकेच्या अखत्यारीत येणाऱ्या 100 लोकांना घरे वाटप करण्यात आली असून गुरुवारी उगार येथील आमदार मुख्यालयात घरे बांधण्यासाठी मंजुरी पत्र वाटप केल्यानंतर आमदार बोलत होते. घरांपासून वंचित असलेल्या नागरिकांसाठी मी सातत्याने प्रयत्न करत आहे, त्यांना काही दिवसांतच तालुक्यात पुन्हा एक हजार घरे मंजूर होतील, मात्र मंजूर घरांचे वाटप करताना तुम्ही सर्वांमध्ये भेदभाव निर्माण करत आहात आणि अंतर्गत कलहामुळे गरजू लोकांना घरे न देऊन वंचित ठेवणारे तुम्हीच आहेत अशा कानपिचक्या देऊन ते सर्व निवडून आलेल्या सदस्यांना म्हणाले कि “शासनाचे विशेषाधिकार घरापासून वंचित असलेल्या नागरिकापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा.”
उगार नगरपालिकेचे मुख्याधिकारी सुनील बबलादी म्हणाले की, आमदार राजू कागे यांनी प्रयत्न केले आहेत, उगार नगरपालिकेत 100 घरे मंजूर झाली आहेत, त्यापैकी 80 लोकांना मंजूरी पत्रे दिली जात आहेत, अनुदानाचे हप्ते टप्प्याटप्प्याने सोडले जात आहेत यातून घरे बांधा आणि लाभ घ्या असे सांगितले.
यावेळी नगरसेवक महादेव ओडगावे, सोनाबाई सांगवे, हारुण मुल्ला, सतीश जगताप, वर्षा नाईक, भारती जगताप, शैला मादार, फातिमा नदाफ, विजय आसुदे , रुस्तुम सुतार, बसवराज पाटील, दिलीप हुक्केरी, शेखर कुराडे, स्वाती भजंत्री आदींची सभागृहात उपस्थिती होती. तसेच .सर्व सदस्य गावातील काँग्रेस पक्षाचे नेते उपस्थित होते.


Recent Comments