कागवाड पोलीस ठाणे हद्दीतील मध्यभागी उसाच्या ट्रॅक्टर-ट्रॉलीला कारची धडक बसून एक जण जागीच ठार तर तीन जण गंभीर जखमी झाले.

गुरुवारी रात्री झालेल्या अपघातात शेजारच्या सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील 46 वर्षीय उमेश काळे यांचा जागीच मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले.
सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील काळे कुटुंब बेळगावहून कामानिमित्त परतत असताना कागवाड गावाजवळ हुंडाइ कार क्रमांक एमएच 13 सीएस 0739 ची ट्रॅक्टर ट्रॉलीला धडक बसली. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या तिघांना मिरजेतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
क्राइम पीएसआय, पीबी पुजारी, एएसआय एस बी सोनवणे यांनी घटनास्थळी भेट देऊन तपास केला.


Recent Comments