Hukkeri

शॉर्टसर्किटमुळे एका खासगी बसला आग : चालकाच्या प्रसंगावधानाने वाचला ३५ प्रवाशांचा जीव

Share

शॉर्टसर्किटमुळे एका खासगी बसला आग लागल्याची घटना घडली आहे. मात्र चालकाच्या प्रसंगावधानाने झोपेत असलेले 35 प्रवासी आगीच्या दुघटनेतून बचावले.

हुक्केरी तालुक्यातील संकेश्वर जवळील हरगापूर येथे पुणे -बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावर मुंबईहून बंगळुरूकडे जाणाऱ्या शर्मा ट्रॅव्हल्सच्या खासगी बसला पहाटे चार वाजता शॉर्ट सर्किटमुळे आग लागली.त्यावेळी चालकाने बस थांबवली आणि सर्व प्रवाशांना खाली उतरवले . सुदैवाने बसमधील सर्व प्रवासी बचावले असून बस मात्र पूर्णपणे जळून खाक झाली.

संकेश्वरचे पोलीस निरीक्षक शिवशरण आवुजी यांचे कर्मचारी एम.एम.जांबगी व अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले व आग विझवून गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.

Tags: