Dharwad

धारवाडमध्ये 60 हजार रुपये किमतीची 141.60 लिटर दारू जप्त

Share

अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात धारवाड सीसीबी पोलिसांना यश आले आहे.

धारवाड तालुक्यातील होन्नापूर गावातील 27 वर्षीय सोमप्पा मिसगेरी नावाच्या व्यक्तीला 29 फेब्रुवारी रोजी धारवाडच्या सप्तपूरजवळ बेकायदेशीररीत्या दारूची विक्री करत असताना सीसीबी विभागाचे एसटी ओडेयार यांच्या नेतृत्वाखाली सीसीबीचे निरीक्षक पीआर गंगेनहळ्ळी आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी छापा टाकून अटक केली.

त्याच्याकडून 60 हजार रुपये किमतीची 141.60 लिटर दारू आणि गुन्ह्यात वापरलेली इंडिका कार जप्त करण्यात आली आहे. यावेळी सीसीबी पोलिसांनी एकूण 1.6 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी धारवाड उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

Tags: