मोसमी पावसाने ओढ दिल्याने राज्यात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आजपर्यंत ‘नया पैसे अनुदान’ जारी केलेले नाही, असा आरोप भाजपचे प्रदेश प्रवक्ते अश्वत्थ नारायण यांनी केला.
बेळगाव येथे पत्रकार परिषदेला संबोधित करताना भाजपचे प्रदेश प्रवक्ते अश्वत्थ नारायण म्हणाले की, मान्सूनच्या पावसाने पाठ फिरवल्याने राज्यात भीषण दुष्काळ पडला आहे. मात्र जिल्हा पालक मंत्री दौरे करत नसल्याची तक्रार केली. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी नुकताच जनता दर्शन कार्यक्रम घेतला. त्यांनी अनेक लोकांच्या समस्या सोडवल्याचा दावा केला. मात्र तो खोटा आहे. बीएस येडियुरप्पा मुख्यमंत्री असताना महापूर आला होता. त्यावेळी ज्यांच्या घराची पडझड झाली त्यांना ५ लाख रुपये आणि ज्यांच्या पिकाचं नुकसान झालं त्यांना ५० हजारांची मदत दिली होती. मात्र काँग्रेस सरकारने दुष्काळ पीडितांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप अश्वत्थ नारायण यांनी केला.
राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडली आहे, बेळगाव अधिवेशनावेळी एका महिलेवर बेळगावात हल्ला झाला, काल कागवाडमध्ये झाला, राज्याचे गृहमंत्री परमेश्वर किंवा प्रियांक खर्गे यांना हे माहीत आहे की नाही, कोणास ठाऊक. काल कलबुर्गी येथे दोन खून झाले आहेत.
केंद्राच्या निती आयोगाच्या बैठकीला उपस्थित न राहता मुख्यमंत्री सिद्दरामय्या केंद्र सरकार अनुदान देत नसल्याचे विनाकारण बोलत आहेत. जीएसटीच्या बैठकीला न जाता केंद्र जीएसटी परतावा देत नसल्याचे खोटं पसरवत असल्याचं ते म्हणाले.
पत्रकार परिषदेत प्रदेश भाजप उपाध्यक्ष अनिल बेनके, भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील, माजी विधान परिषद सदस्य महांतेश कवटगीमठ, जिल्हा भाजप प्रसारमाध्यम प्रमुख नगरसेवक हनुमंत कोंगाळी उपस्थित होते.


Recent Comments