Belagavi

बेळगावात पुन्हा कानडीकरणाचा वरवंटा; पालिकेने हटवले कन्नडेतर बोर्ड

Share

बेळगावात राज्य सरकारने पुन्हा कानडीकरणाचा वरवंटा फिरवण्यास सुरुवात केली आहे. सरकारच्या आदेशावरून बेळगाव पालिकेने कन्नडेतर बोर्ड हटवण्यास सुरुवात केली आहे.

राज्य शासनाच्या अधिसूचना व नियमानुसार कन्नड भाषेचा वापर न करणाऱ्या शहरातील व्यावसायिक दुकाने व दुकानासमोरील कन्नडेतर बोर्ड, चिन्हे हटविण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. फलकांवर कन्नडला अव्वल स्थान देणे आणि पूर्णपणे परदेशी भाषांमधील फलक हटवण्याची नोटीस यापूर्वीच जारी करण्यात आली होती. नोटीसला योग्य प्रतिसाद न देणाऱ्या दुकानांचे फलक आज मनपाच्या कर्मचाऱ्यांनी काढले.

काही दुकानांना नोटिसा देण्यात आल्या असून, त्यांनी तात्काळ फलक न बदलल्यास महापालिकेचे अधिकारी असे फलक काढून टाकतील आणि त्यासाठी लागणारा खर्च संबंधित दुकानमालकांकडून वसूल केला जाईल, असे पालिका आयुक्त लोकेश यांनी सांगितले. शासनाच्या अधिसूचनेनुसार फलक हटविण्याचे काम सुरू करण्यात आले असून ते यापुढेही सुरू राहणार आहे, असे ते म्हणाले.

Tags: