Belagavi

राष्ट्रीय बॉडीबिल्डिंग स्पर्धेत चमकले बेळगावचे बॉडी बिल्डर्स

Share

तमिळनाडू येथे २३ ते २६ फेब्रुवारी दरम्यान झालेल्या १४ व्या ज्युनियर, मास्टर्स आणि दिव्यांगांच्या राष्ट्रीय बॉडी बिल्डिंग स्पर्धेत बेळगावच्या बॉडीबिल्डर्सनी चमकदार कामगिरी केली आहे. गणेश पाटील आणि प्रताप कालकुंद्रीकर यांनी विविध गटांत यश मिळवले आहे.

बेळगावचे नामवंत शरीरसौष्ठवपटू प्रताप कालकुंद्रीकर यांनी या स्पर्धेत ४०-४९ वयोगटात व ८० किलो वजनगटात रौप्य पदक मिळवले. तर गणेश पाटील यांनी ६५ किलो वजनगटात सुवर्णपदक मिळवले. इंडियन बॉडीबिल्डर्स फेडरेशनने घेतलेल्या या स्पर्धेचे वैयक्तिक सर्वसाधारण विजेतेपद आंध्रप्रदेशच्या कोडुरी पवनकुमार (८५ गुण) याने पटकावले. तर १४० गुणांसह सांघिक गटाचे सर्वसाधारण विजेतेपद मणिपूरने मिळवले.

१२० गुणांसह सांघिक गटाचे उपविजेतेपद आंध्रप्रदेशने मिळवले. महाराष्ट्र संघाने ७० गुणांसह प्रथम उपविजेतेपद मिळवले. तमिळनाडू हौशी बॉडीबिल्डर्स फेडरेशनच्या सहयोगाने झालेल्या या १४ व्या राष्ट्रीय बॉडीबिल्डिंग स्पर्धेत बेळगावचे आंतरराष्ट्रीय बॉडीबिल्डिंग अंपायर अजित सिद्दण्णावर उपस्थित होते.

Tags: