विधानसौधमध्ये पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा दिल्याचे सिद्ध झाल्यास कठोर कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सांगितले.
बेंगळुरूमध्ये पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले की, विधानसौधमध्ये पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा दिल्या गेल्याचे सिद्ध झाल्यास, ज्या कोणी घोषणा दिली असेल त्याच्यावर आम्ही कठोर कारवाई करू. घोषणाबाजी केल्याच्या आरोपाची आधी चौकशी होऊ द्या. आम्ही तपासासाठी हे प्रकरण यापूर्वीच एफएसएलला दिले आहे. देशद्रोह्यांचा बंदोबस्त करावाच लागेल, असे ते म्हणाले.


Recent Comments