बेळगाव जिल्ह्यातील चंदनहोसूर गावात डॉ.बी.आर. आंबेडकर शक्ती संघाच्या नवीन शाखेचे उद्घाटन करण्यात आले.
चंदनहोसूर गावात डॉ.बी.आर. आंबेडकर शक्ती संघाच्या नवीन शाखेचे उद्घाटन करण्यात आले. यानिमित्त संघाच्या नामफलकाचे अनावरण करण्यात आले. बाबासाहेब आंबेडकर व अन्य महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. यावेळी संस्थापक प्रदेशाध्यक्ष लक्ष्मण कोलकार यांनी संघटनेच्या सर्व सदस्य व पदाधिकाऱ्यांना दलित, वंचित समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी संघटितपणे लढा देण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमात प्रदेश उपाध्यक्ष सागर कोलकार, एसटी युनिटचे जिल्हाध्यक्ष भरमू कुर्ली, अशोक नाईक, अदिवेप्पा कोळकर, भीमाशी यमेत्री, शोभा माथिवडे, कस्तुरी निंगनवर, विलास कोलकार, नागेश कोलकार, संघटनेचे तारिहाळ शाखेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.


Recent Comments