पुत्र अमितला राजकारणात रस नाही, पण त्याची मित्रमंडळी, पक्ष कार्यकर्ते त्याला निवडणूक लढाव्याचा आग्रह करताहेत. त्याला निवडणूक लढवायची असेल तर लढवू दे असे सांगत माजी राज्यसभा सदस्य डॉ. प्रभाकर कोरे यांनी मुलासाठी फलंदाजी केली.
लोकसभा निवडणुकीला अवघे काही महिने शिल्लक असताना चिक्कोडी लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकीटासाठी तिघेही जोरदार लॉबिंग करत आहेत. भाजपचे विद्यमान खासदार अण्णासाहेब जोल्ले यांनी याआधीच विविध खेळ आणि इतर उपक्रमांचे आयोजन करून मतदारसंघात प्रचाराला सुरुवात केली आहे. दिवंगत मंत्री उमेश कत्ती यांचे बंधू माजी खासदार रमेश कत्ती, माजी राज्यसभा सदस्य प्रभाकर कोरे यांचे निकटवर्तीय माजी विधानपरिषद सदस्य महांतेश कवटगीमठ हेही तिकिटासाठी खुलेआम लॉबिंग करत आहेत. आता माजी राज्यसभा सदस्य प्रभाकर कोरे यांनी आपला मुलगा अमिता कोरे लोकसभेसाठी इच्छुक असल्याचे सांगून आपल्या मुलासाठी बॅटिंग केली आहे.
बेळगाव येथे पत्रकार परिषदेत बोलताना प्रभाकर कोरे यांनी सांगितले की, चिक्कोडी लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवण्यास आपला पुत्र अमित कोरे इच्छुक आहे. पक्षाने उमेदवारी दिल्यास ते निवडणूक लढवतील. अमितने चिक्कोडीत जनतेची खूप सेवा केली आहे. त्यांनी साखर कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना खूप फायदा करून दिला आहे. त्यांना तिकीट द्यावे असा त्याच्या चाहत्यांचा आग्रह आहे. अमितला तिकीट दिल्यास तो नक्कीच निवडणूक लढवेल, असे ते म्हणाले.
एकंदर, चिक्कोडी मतदारसंघातून भाजपच्या तिकीटासाठी तिरंगी लढत सुरु असतानाच आता प्रभाकर कोरे यांच्या या वक्तव्याने उत्सुकता निर्माण झाली आहे.


Recent Comments