विद्यानगर, खानापूर येथील ज्येष्ठ महिला श्रीमती विजया कृष्णराव पाटील यांचे आज पहाटे तीन वाजून 45 मिनिटांनी निधन झाले. निधन समयी त्या 89 वर्षांच्या होत्या.
त्यांच्या पश्चात तीन चिरंजीव, एक कन्या, सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांचे अस्थी विसर्जन गुरुवार दिनांक 29 फेब्रुवारी रोजी सकाळी साडेआठ वाजता खानापूर येथे होणार आहे. मराठा मंडळ संस्थेतील सेवानिवृत्त मुख्याध्यापक कै. के एल पाटील यांच्या त्या पत्नी, तर खानापूरचे सुप्रसिद्ध डॉक्टर शिवाजीराव पाटील यांच्या त्या मातोश्री होत.


Recent Comments