Belagavi

पोलीस आयुक्त सिद्रामप्पा यांचा चहापान कार्यक्रम

Share

बेळगावचे पोलीस आयुक्त एस. एम. सिद्रामप्पा लवकरच निवृत्त होत असल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी शहरातील मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळासह विविध संघ-संस्थांच्या पदाधिकाऱ्यांसोबत छोटेखानी चहापान कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

बेळगावचे पोलीस आयुक्त एस. एम. सिद्रामप्पा लवकरच सेवानिवृत्त होत आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांनी शहरातील विविध संघ-संस्थांच्या पदाधिकाऱ्यांसोबत आपल्या निवासस्थानी चहापान कार्यक्रमाचे आयोजन केले होते. याप्रसंगी शहरातील मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळासह विविध संघ-संस्थांचे

पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी पोलीस आयुक्त सिद्रामप्पा यांनी त्यांच्या कार्यकाळात शहरात गणेशोत्सव, शिवजयंती आदी सार्वजनिक सण-समारंभ सुरळीत पार पाडण्यासाठी सहकार्य

दिल्याबद्दल आभार मानले. यावेळी मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर, कार्यकारी अध्यक्ष रणजित चव्हाण-पाटील, जनसंपर्क प्रमुख विकास कलघटगी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Tags: