बेळगाव येथे मार्चच्या पहिल्या आठवड्यात होणाऱ्या कृषी महोत्सवात गोरक्षणाचा प्रसार व्हावा, अशी सूचना हुक्केरी हिरेमठ येथील श्री चंद्रशेखर शिवाचार्य स्वामीजी यांनी केली.
शनिवारी रोटरी क्लब ऑफ बेळगाव सेंट्रलतर्फे कृषी महोत्सवाचे निमंत्रण श्री चंद्रशेखर शिवाचार्य स्वामीजी यांना देण्यात आले. रोटरी क्लब ऑफ बेळगाव सेंट्रलच्या वतीने बेळगावमध्ये जिल्हा प्रशासन, जेपीएम, कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दरम्यान दि. 7 ते 11 मार्च दरम्यान कृषी महोत्सवाचे आयोजन केले आहे. या पाच दिवसांमध्ये ८ मार्चला महाशिवरात्रही आहे. त्या दिवशी गो जागरण दिन साजरा करण्याची सूचना श्री. चंद्रशेखर शिवाचार्य स्वामीजी यांनी केली.

यावेळी रोटरी क्लब ऑफ बेळगावचे केंद्रीय अध्यक्ष मंजुनाथ अळवणी म्हणाले की, हुक्केरी स्वामीजींचे आशीर्वाद रोटरी क्लबवर आहेत. त्यांच्या सूचनेनुसार कृषी महोत्सवातच गोरक्षण दिन होणार आहे. रोटरी क्लब ऑफ बेळगावचे केंद्रीय सचिव अभय जोशी, माजी अध्यक्ष रवी हत्तरगी, अभिनंदन दरगशेट्टी आदी उपस्थित होते.


Recent Comments