Belagavi

फेसबुक फ्रेंड्स सर्कलमुळे वृद्ध महिलेला मिळाले उपचार

Share

बेळगावातील फेसबुक फ्रेंड्स सर्कलच्या सदस्यांमुळे एका वृद्ध महिलेला उपचार मिळण्यास मदत झाली.

महाद्वार रोड 4 था क्रॉस-आपटेकर गल्ली येथे सुमारे 75 वर्षांच्या सुशीला सुतार भाड्याच्या खोलीत एकट्या राहतात. त्यांची काळजी घेण्यासाठी तिला पती किंवा मुले नाहीत. त्यांना पायाची समस्या असून पायात खूप वेदना होत आहेत. याबाबतची माहिती मिळताच फेसबुक फ्रेंड्स सर्कलच्या सदस्यांनी त्यांना 108 रुग्णवाहिकेत उपचारासाठी बिम्स रुग्णालयात हलवले. त्यापूर्वी पोलिसांना कळवण्यात आले. पीएसआय रीता नारायण लाड आणि टीम घटनास्थळी पोहोचली आणि रुग्णाची माहिती घेतली.

तसेच प्रभाग क्रमांक 15च्या नगरसेविका नेत्रावती भागवत घटनास्थळी हजर होत्या. फेसबुक फ्रेंड सर्कलच्या टीममध्ये संतोष दरेकर, अवधूत तुडवेकर आणि सिद्धार्थ शिर्के उपस्थित होते. नगरसेविका नेत्रावती भागवत, रुग्णाचे शेजारी आणि पोलीस विभाग यांनी मदत केली. वृद्धेला केलेल्या मदतीसाठी फेसबुक फ्रेंड सर्कलच्या टीमचे कौतुक केले. सध्या रुग्णाला उपचारासाठी बेळगाव येथील बिम्स रुग्णालयातील मेडिसिन वॉर्डमध्ये हलविण्यात आले आहे.

Tags: