हुक्केरी तालुक्यातील संकेश्वर, यमकनमर्डी आणि हुक्केरी शहर या तीन गावांमध्ये शासनाच्या पाच हमी योजनांची यशस्वी अंमलबजावणी करण्यात आल्याचे हुक्केरीचे नूतन तहसीलदार बलराम कट्टीमणी यांनी सांगितले.

हुक्केरी शहरामध्ये आयोजित हमी योजनांच्या लाभार्थ्यांच्या भव्य संमेलनाचे उद्घाटन करून ते बोलत होते. प्रसारमाध्यमांपर्यंत पोहोचविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करण्यात आला असून, आज झालेल्या संमेलनात हजारो लाभार्थ्यांनी सहभाग घेऊन या प्रकल्पाबाबत आनंद व्यक्त केला.तालुक्यातील होबळी स्तरावरील तीन संमेलने यशस्वी झाल्याचं त्यांनी सांगितलं.

यावेळी माजी मंत्री शशिकांत नाईक, नगरपालिका आयुक्त किशोर बेन्नी, सीडीपीओ होलेप्पा एच, , महसूल निरीक्षक मल्लिकार्जुन सारापुरे, व्ही.ए.कुमार राठोड , काँग्रेस ब्लॉक अध्यक्ष विजय रवदी , महिला युनिट अध्यक्ष रेखा चिक्कोडी, प्रचार समिती अध्यक्ष मल्लकार्जुन राशिंगे, प्रकाश जिलार, आणि अन्य उपस्थित होते


Recent Comments