Belagavi

हुगार-गुरव समाजाचे मुडलगी सीपीआयना निवेदन

Share

मुडलगी पोलीस स्थानकाच्या हद्दीत झालेल्या बाळकृष्ण रामचंद्र गुरव यांच्या खून प्रकरणाचा गांभीर्याने तपास करून मारेकऱ्यांना अटक करण्याची मागणी हुगार, गुरव, जीरा, पुजारी समाज बेळगाव जिल्हा शाखेने केली आहे.

हुगार, गुरव, जीरा, पुजारी समाज बेळगाव जिल्हा शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी समाजाचे नागरिक बाळकृष्ण रामचंद्र गुरव यांच्या खूनप्रकरणी मुडलगी मंडळ पोलीस निरीक्षकांची 22/02/2024 रोजी भेट घेऊन त्यांना याबाबत निवेदन दिले. बाळकृष्ण रामचंद्र गुरव यांच्या खून प्रकरणाचा पोलिसांनी गांभीर्याने तपास करून त्यांच्या मारेकऱ्यांना बेड्या ठोकण्याची तसेच त्यांच्या कुटुंबियांसाठी योग्य सुरक्षा व्यवस्था करण्याची मागणी या निवेदनात केली आहे.

दरम्यान, समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी बाळकृष्ण गुरव यांच्या कुटुंबीयांनी भेट घेऊन त्यांना धीर दिला. पुढील कायदेशीर लढ्याबाबत आवश्यक माहिती संकलित करून राज्य व जिल्हा शाखेच्या सहकार्याने बेळगाव जिल्ह्याचे एसपी आणि जिल्हाधिकाऱ्यांना भेटून न्याय मिळवून देण्याचे आवाहन करण्याचे ठरविण्यात आले.

Tags: