बेळगांव येथील प्रसिद्ध कुस्तीपटू अतुल सुरेश शिरोळे व यशपालसिंह पणवर यांनी भारतीय खेल प्राधिकरणाच्या वतीने घेण्यात येणारा कोचिंग कोर्स पूर्ण केला असून त्यांना ‘अ’ श्रेणी प्राप्त झाली आहे. त्यामुळे पहिलवान म्हणून कुस्तीचे मैदान गाजवणारे अतुल शिरोले आणि यशपालसिंह पणवर आता कुस्ती प्रशिक्षक म्हणून मैदानावर उतरणार आहेत.
होय, अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदाने गाजवणारे बेळगावचे प्रसिद्ध कुस्तीपटू अतुल सुरेश शिरोळे व यशपालसिंह पणवर यांनी पंजाबमधील पतियाळा येथे नेताजी सुभाष चंद्र नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्समधून कुस्ती प्रशिक्षक पदाचा कोर्स यशस्वीरीत्या पूर्ण केला आहे. याबाबत त्यांनी इन न्यूजला अधिक माहिती दिली.

पंजाबमधील पतियाळा येथे नेताजी सुभाष चंद्र नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्टस मध्ये कुस्ती प्रशिक्षक पदासाठी डिप्लोमा कोर्स करण्यासाठी देशभरातील विविध भागांतून पैलवान उपस्थित होते.


Recent Comments