Banglore

भाजप प्रवेशावरून यत्नाळ-प्रियांक खर्गे यांच्यात कलगीतुरा

Share

अर्थसंकल्पीय अधिवेशनात गुरुवारी विधानसभेत मंत्री प्रियांक खर्गे आणि भाजपचे बसनगौडा पाटील-यत्नाळ यांच्यात पक्ष प्रवेशाच्या मुद्द्यावरून चांगलीच जुंपल्याचे पहायला मिळाले.

गुरुवारी सभागृहात चर्चेदरम्यान भाजप आमदार बसनागौडा पाटील-यत्नाळ यांनी, मला माहित नाही की आणखी कोण भाजपमध्ये प्रवेश करेल, कमलनाथ भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. त्यानंतर मल्लिकार्जुन खर्गे यांचे नावही चर्चेत आहे, असे म्हटल्याने या शब्दयुद्धाला प्रारंभ झाला

यावर प्रियांक खर्गे यांनी प्रत्युत्तर दिले, हे शक्य नाही. आमच्या कुटुंबातील मढेही भाजपात जाणार नाही. ते आपल्या रक्तातच नाही. तुमच्या रक्तात संविधान नाही तसे आमच्या रक्तात आरएसएस नाही असे ते म्हणाले.  त्याला प्रत्युत्तर देताना यत्नाळ म्हणाले की, संविधानाची अंमलबजावणी आम्हीच करणार आहोत. काँग्रेसने आंबेडकरांना काय आदर दिला? असा प्रतिवाद केला.

दरम्यान, 40% कमिशनबाबत चर्चा झाली. आता तुमचेच सरकार आहे. त्याची चौकशी करा असे आव्हान यत्नाळ यांनी दिले. त्यावर तुमचे सहकार्य मिळाल्यास आठवडाभरात तपास पूर्ण करू, असे तिखट उत्तर प्रियांक खर्गे यांनी यत्नाळ यांना दिले.

Tags: