लोकसभेच्या निवडणुका दोन महिन्यात येतील. या निवडणुकीत भाजपचा विजय होऊन , नरेंद्र मोदी पुन्हा एकदा पंतप्रधान व्हावेत, असे म्हणत एक तरुण सायकलवरून विविध जिल्ह्यांच्या दौऱ्यावर निघाला आहे .
हुबळी तालुक्यातील मंटूर गावातील भरत जैन हा सायकल वरून विविध जिल्ह्यांचा प्रवास करणार आहे . भरत हा P&P ट्रॅव्हल्समध्ये टॅक्सी चालक म्हणून काम करतो. मोदी आपण आता पुन्हा एकदा या देशाचे पंतप्रधान व्हा, असे म्हणत सायकलवरून राज्यभराचा दौरा करीत आहे .
धारवाड येथील पी ॲण्ड पी ट्रॅव्हल्सच्या कार्यालयापासून सुरू झालेली ह्या सायकल रॅलीचा शुभारंभ प्रभाग क्रमांक 21 मधील नागरीकांनी केला हे विशेष .
देश टिकवायचा असेल तर भाजपला जिंकावेच लागेल, मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावेत, या उद्देशाने भरतने ही सायकल यात्रा काढली आहे. भरत धारवाडहून निघाला आणि सायकलवरून वेगवेगळ्या जिल्ह्यात फिरणार आहे .


Recent Comments