Belagavi

आपण लोकसभा निवडणूक लढवणार नाही : मंत्री सतीश जारकीहोळी

Share

जिल्हा पालक मंत्री सतीश जारकीहोळी यांनी सांगितले की, माझी मुलगी प्रियांका जारकीहोळी चिक्कोडी मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवणार नाही.

बेळगाव येथील जिल्हा क्रीडांगणावर पत्रकारांशी बोलताना जिल्हा पालक मंत्री सतीश जारकीहोळी यांनी आपण बेळगाव लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार नसल्याचे सांगितले . मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या मुलासह दोन जणांची नावे हायकमांडकडे पाठवण्यात आली आहेत. पक्षात मी निवडणूक लढविण्याबाबत चर्चा होऊ शकते. मात्र मी निवडणूक लढवत नसल्याचे पत्रकारांच्या प्रश्नाला त्यांनी उत्तर दिले

चिक्कोडी लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसमध्ये अनेक इच्छुक आहेत. सामान्य कार्यकर्त्यांना तिकीट दिले जाईल. मात्र माझी मुलगी आता निवडणूक लढवत नाही, असे ते म्हणाले.

आणखी दोन लोकसभा मतदारसंघ जिंकण्यासाठी आधीच रणनीती आखण्यात आली आहे, आम्ही कार्यकारिणीची बैठक घेणार असून, बेळगाव आणि चिक्कोडी मतदारसंघातील उमेदवारांची नावे पुढील आठवड्यात जाहीर केली जातील, असेही ते म्हणाले.

Tags: